साहित्य : 2 चमचे रागी पीठ, अर्धी वाटी दही, अर्धा चमचा मोहरी, पाव इंच आल्याचा तुकडा खिसून, 1 हिरवी मिरची बारीक चिरून, 2 कढीपत्ता पाने बारीक चिरून, 1 चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीपुरते मीठ, 1 चमचा तेल
कृती : पॅनमध्ये रागी पीठ घेऊन त्यात दीड वाटी पाणी ओतून मिश्रणात गुठळय़ा न राहता एकसारखे ढवळत राहावे. गॅसच्या मंद आचेवर हे मिश्रण एकसारखे ढवळत शिजवून घ्यावे. आता हे मिश्रण थोडे दाट झालेले दिसेल. तयार मिश्रण गार होण्यास ठेवावे. नंतर त्यात दही मिक्स करून मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करावे. दुसऱया पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी टाकून तडतडावी. नंतर त्यात हिरवी मिरची, आलं आणि कढीपत्ता टाकून फोडणी तयार करावी. तयार फोडणी रागी पीठाच्या मिश्रणात मिक्स करावी. वरुन चवीपुरते मीठ टाकून मिक्स करावे. आता तयार रागी कांजी कोथिंबीरीने सजवून पिण्यास द्यावे.









