हुपरी/वार्ताहर
इचलकरंजी-हुपरी मार्गावर रांगोळी येथील माळभाग रस्त्यावर आज, सकाळच्या सुमारास ट्रक-टेंम्पोची जोरदार धडक झाली. या अपघातात ट्रकचालक गंभीर जखमी झाला. अपघातानंतर या मार्गावर बराचवेळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, इचलकरंजीकडे जळाऊ लाकूड भरुन घेऊन जाणारा आयशर ट्रक क्रमांक (एम.एच.१०- ४१३५) व हुपरी कडे जाणारा सर्व्हिस टेंपो क्रमांक (एम.एच.७१६४) या वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात ट्रकचालक गंभीर जखमी झाला. तर क्लिनरला दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी इचलकरंजी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. लाकुड भरलेला ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला असून त्याचे खूप नुकसान झाले आहे. पण सुदैवाने याठिकाणी कोणतीही जिवितहानी झाली नाही.
दरम्यान ग्रामस्थांनी जेसीबी मशीनच्या साहाय्याने रस्त्यावर पलटी झालेला टेंपो बाजूला काढल्यावर वाहतूक सुरळीत झाली. या मार्गावर वाहनांची वर्दळ वाढली असल्यामुळे रांगोळी गाव ते माळभाग या रस्त्याची रुंदी वाढविण्यासाठी संबंधित लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने तात्काळ लक्ष देवून समस्या निवारण करण्याची मागणी होत आहे.
Previous Articleमेकेदातू प्रकल्पाबाबत तडजोड नाही: मुख्यमंत्री बोम्माई
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.