हुबळी/प्रतिनिधी
रस्त्यावर पडलेली माती काढण्यावरून दोन कुटुंबात झालेला वाद विकोपाला जाऊन परस्परांना जबर मारहाण झाल्याची घटना, गब्बूरु बायपास जवळ घडली आहे.
रस्त्यावर पडलेली माती काढण्यावरून आधी दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर त्या दोघांची माणसे एका ठिकाणी येऊन मारामारी झाली. एका कुटुंबातील रियान अहमद गुडमाले तसेच दुसऱया कुटुंबातील असिफ अली दोडवाड हे दोघे जखमी झाले आहेत. विद्यानगर येथील किम्स रूग्णालयात प्राथमिक रूग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना सोडण्यात आले. कसबापेठ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली. हुबळी – धारवाडचे कायदा सुव्यवस्था विभागाचे पोलिस उपायुक्त रामराजन यांनी किम्स रूग्णालयाला भेट देऊन, घटनेची चौकशी केली.









