बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावात कोरोनाचे तीन रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आल्याच्या पार्श्वभुमीवर आता निर्बंधांचा बडगा अधिक कठोर करण्यात आला आहे. प्रशासनाने काही वेळासाठी सवलती देण्याचे धोरण राबविले होते. परंतु त्या धोरणामध्ये बदल करून आता पुन्हा कठोर निर्बंध लादण्याची मोहीम सुरू झाली आहे. कॅम्प विभागात सर्व बाजुने नाकाबंदी करून प्रशासनाने प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
शहरातील अनेक मार्गांवर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. मुभा मिळाल्यामुळे अनेक नागरिकांचा संचार वाढल्याचे चित्र दिसून येत होते. मात्र कोरोना प्रसाराचा धोका वाढण्याचे चित्र सामोरे आल्यामुळे आता लॉकडाऊन अधिकच कठोरपणे पाळण्याचे धोरण जाहीर झाले आहे. या पार्श्वभुमीवर शहरातील अनेक मार्गांवर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. या बंदोबस्ताकरीता कॅम्प भागातील सर्व रस्त्यांवर बॅरिकेड्स लावून संचार रोखण्यात आला आहे. त्याचप्रमाणे इतर प्रमुख चौकांमध्ये देखील पोलीस तैनात करून नागरिकांना प्रवेश बंदीची सूचना देण्यात येत आहे.









