वृत्तसंस्था/ पॅरिस
रविवारी येथे झालेल्या एटीपी टूरवरील पॅरीस मास्टर्स पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत रशियाच्या चौथ्या मेदव्हेदेवने एकेरीचे जेतेपद मिळविताना जर्मनीच्या ऍलेक्झांडर व्हेरेव्हचा पराभव केला.
अंतिम सामन्यात मेदव्हेदेवने व्हेरेव्हचा 5-7, 6-4, 6-1 असा पराभव केला. मेदव्हेदेवने पहिल्यांदाच या स्पर्धेचे जेतेपद मिळविले आहे. वैयक्तिक टेनिस कारकीर्दीतील मेदव्हेदेवचे हे आठवे विजेतेपद आहे. मेदव्हेदेवने आतापर्यंत तीनवेळा मास्टर्स टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळविले आहे. लंडनमध्ये रविवारपासून सुरू होणाऱया एटीपी टूरवरील अंतिम स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मेदव्हेदेव आणि व्हेरेव्ह लंडनकडे प्रयाण करणार आहेत. 2018 साली जर्मनीच्या व्हेरेव्हने एटीपी टूरवरील अंतिम स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते.









