मास्को
चीन आणि रशिया या दोन देशांमध्ये बंधुभाव वाढवणारा नवा नदीवरचा पूल नुकताच पूर्ण झाला असून तो वाहतुकीकरीता खुला केला गेल्याचे समजते. चीनमधील रेल्वे सेवेकरीता अत्यंत उपयोगी ठरणारा असा हा पूल ठरणार आहे. चीन-रशिया या दोन देशांना जोडणारा तोंगजीयांग-निझ्नेलेनीनस्कोय पूल नुकताच खुला करण्यात आला जो बांधायला सुमारे 7 वर्षाचा कालावधी लागला आहे. चीनमधील तोंगजीयांग शहरापासून हा पूल सुरू होतो आणि रशियात निझ्नेलेनीनस्कोय या शहराच्या सीमेच्या हद्दीवर संपतो. अमुर नदीवर बांधण्यात आलेल्या या पूलामुळे चीनमधील उत्तरपूर्व रेल्वे जाळे रशियातील सायबेरीयन रेल्वेशी जोडले जाणार आहे. सदरच्या पूलाची लांबी 2 हजार 215 मीटर इतकी असून 7 वर्षे पूल बांधण्यासाठी लागली आहेत. यातील पूलाचा बराचसा भाग हा चीनच्या हद्दीत येत असल्याचे समजते.









