ऑनलाईन टीम / मॉस्को :
रशियातील सर्वात लोकप्रिय वाहिनी ‘चॅनेल वन’ अवकाश संस्था रॉसकॉसमॉस यांच्या सहकार्याने अंतराळात चित्रीकरण करणार आहे. त्यासाठी चॅनेल वन एका अभिनेत्रीचा शोध घेत आहे.
‘चॅलेंज’ असे चॅनेल वनच्या चित्रपटाचे तात्पुरते नाव आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर ऑक्टोबर 2021 पासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. या कामासाठी या वाहिनीला 25 ते 40 वयोगटातील 150 ते 180 सेंटीमीटर उंच आणि 50 ते 70 किलो वजन असलेली अभिनेत्री हवी आहे.
अभिनेत्री धावणे, पोहणे आणि ऍरोबिकस या क्षेत्रात कुशल असावी, अशी वाहिनीची अपेक्षा आहे.









