बेंगळूर/प्रतिनिधी
माजी मंत्री रमेश जारकिहोळी सोमवारी विशेष तपास विभागासमोर (एसआयटी) हजर झाले नाहीत कारण त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी जारकिहोळी यांना ताप आला होता. तपासणीनंतर त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना बेळगाव जिल्ह्यातील गोकक येथील शासकीय रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तहसील सर्जन डॉ. रवींद्र अँटिन यांनी सांगितले की पूर्वी जारकिहोळी यांना घरी क्वॉरंटिनमध्ये राहण्यास सुचवले होते परंतु दम लागल्यामुळे त्यांना रविवारी रात्री रुग्णालयात आणण्यात आले. जराकिहोळीचे कार चालक, घरातील नोकर आणि अंगरक्षक देखील संसर्गग्रस्त आढळले आहेत.