संकेश्वर येथे रुग्ण, वृद्धांना फळांचे वाटप : कोरोनायोद्धांसाठी स्नेहभोजन, विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप
प्रतिनिधी / संकेश्वर
चिकोडीचे माजी खासदार व बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात करण्यात आला. वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
संकेश्वर शहरातील कार्यकर्त्यांनी येथील सरकारी दवाखाना, वृद्धाश्रम, रुक्मिणी हॉस्पिटल येथे फळे वाटप केले. तसेच कोरोना महामारीत उत्तम कामगिरी बजाविलेले पोलिस, नगरपरिषद कर्मचारी, आशा-अंगणवाडी कार्यकर्त्या व सरकारी हॉस्पिटल येथील वैद्याधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले.
याचबरोबर येथील सुन्नत जमात तंजिम कमिटीतर्फे गरीब मुलांना पाठय़पुस्तक व जय मल्हार स्वहाय्य संघातर्फे वृद्धाश्रम येथे फळे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य पवन कत्ती यांनी माजी खासदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती व कुटूंबावर असेच तुमचे सदैव प्रेम राहू दे, असे मनोगत याप्रसंगी व्यक्त केले.
यावेळी राजेंद्र बोरगावी, नगरसेवक सुनिल पर्वतराव, संजय नष्टी, डॉ. मंदार हावळ, अमर नलवडे, रोहन नेसरी, उमेश काबंळे, हारुण मुल्ला, सलिम शायण्णावर, श्रीकांत हतनुरे, राजेंद्र पाटील, गजानन क्वळ्ळी, राहूल हंजी, पवन पाटील, श्रीकांत परीट, संतोष कमनूरी, शेखर देसाई, नासीर जमादार, दीपक भिसे, जयप्रकाश सावंत, अखिल नदाप, हाजी हुसेनसाब मोकाशी, हाजी ईलीयास मुल्ला, अभिजीत कुरणकर, बसवराज बागलकोटी, राजू सुतार, मंजूनाथ पाटील, गिरीश पाटील, कुमार शेंडे, शेखर क्षीरसागर, प्रल्हाद पाटील, संतोष हतनुरे, सदाशिव पंचडी यांच्यासह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.









