प्रतिनिधी/रत्नागिरी
रत्नागिरी मधील अनेक तरूणांमध्ये साहसी पर्यटनामध्ये ओढ वाढलेली दिसते. अशाच साहसी व अत्यंत कठीण श्रेणीत मोडणारा जिल्ह्यातील कर्जत मधील ढाक भैरी मधील गुहा आणी याच किल्ल्या जवळ असलेला कळकराय सुळका रत्नागिरीतील जिद्दी माउंटेनिअर्सच्या 10 साहसी तरूणांच्या चमुने नुकताच सर केला.
ढाक भैरीला जाण म्हणजे साक्षात मृत्युला आमंत्रण देणे, असे म्हटलं जातं. परंतु या ठिकाणी ज्यांना साहसाच वेड लागलेल असत ते भटके जातातच जातात. अशेच रत्नागिरीतील जिद्दी माउंटेनेरिंगचे भटके धिरज पाटकर, अरविंद नवेले, उमेश गोठिवरेकर, आकाश नाईक, कु.प्राची नाईक, मंदार सावंत, दिनेश आग्रे, शक्ती नागवेकर, कौस्तुभ पड्यार, परेश बाम, आणी या चमुमध्ये सांगली येथुन खास सहभागी झालेले इंद्रजित खंडागळे यांनी भाग घेतला होता. या मध्ये एकमेव कु. प्राची नाईक या तरूणीने सहभाग घेतला होता हे या धाडसी मोहिमेचे खास वैशिष्ठ्य होते.
या किल्ल्यावर कर्जंत वरून सांडशी या गावातुन जातात. या गावातुन जायच असल्यास अनेक डोंगर पार करत या ठिकाणी पोहोचायला जवळजवळ 5 तास लागतात. रत्नागिरीच्या चमुने या सांडशी गावातुन या किल्ल्यापर्यंतचा प्रवास केला. सकाळी 9 वाजता या ट्रेकची सांडशी गावासुन सुरवात करण्यात आली. अवघड असे अनेक डोंगर कपा-यांच्या अडथळ्यांना पार करत 5 तास चालल्या नंतर दुपारी 2.30 वा. रत्नागिरीच्या या चमुला ढाकच्या पायथ्याशी पोहोचण्यात यश आले. यानंतर या ढाक्या गुहेमध्ये जाण्यासाठी सरसोट 90 अंशाची चढाई सुरू झाली. सर्वजण या गुहेत 3.30 ला पोहोचल्या नंतर तिथे थोडावेळ थांबुन पुन्हा त्याच मार्गाने 90 अंशात खाली उतरण्याचा अतिथय खतरनाक असा उलटा प्रवास करत पुन्हा हा चमु ढाकच्या पायथ्याथी असलेल्या गुहेत रात्रीच्या मुक्कामाला थांबला.
याच ढाकच्या किल्ल्याच्या जवळच असलेला कळकराय या सुळक्यावर दुस-या दिवशी सकाळी 3.30 वा उठून पहाटे या चमुने 6 वाजता चढाई ( क्लायंबिंग) करण्यास सुरवात केली. या मोहिमेचे लिडर अरविंद नवेले यांनी लिड करत रोप फिक्स करत पुढे गेले त्यांना आकाश नाईक यांनी मदत केली, त्यांच्या पाठोपाठ उमेश गोठिवरेकर यांनी चढाई केली. अशा प्रकारे एका मागुन एक चढाई करत या सुळक्याच्या माथ्यावर सकाळी 11 वा. सर्वांनी पाय रोवला. या सुळक्यावर पोहोचल्यावर थोड्याच वेळात सुळक्याच्या माथ्यावरून त्याच्या पायथ्यापर्यंत रॅपलिंग करत उतरण्यात आले. आणी या तरूणांच्या या धाडसी मोहिमेची सांगता झाली. या सुळक्याची उंची 200 फुटापर्यत असुन या ठिकाणी सकाळी प्रचंड वेगाने वारे वहातात. या वा-यांचा वेगब ताशी 100 ते 150 इतका असताना देखील या धाडसी तरूणांनी या सुळक्यावर केलेली चढाई एक वैशिष्ठच म्हणावे लागेल.