प्रतिनिधी / रत्नागिरी
जिल्ह्यात कोरोनाचे २५ नवे रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. नव्याने सापडलेल्या २५रुग्णांमध्ये रत्नागिरीत २, कामथे ९, राजापूर ९, मंडणगड १ आणि कळंबनी ४ असे रुग्ण सापडले आहेत. राजापूर तालुक्यात कोरोनाचा झपाट्याने शिरकाव होत असल्याने चिंतेची बाब ठरली आहे.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून झपाट्याने वाढणारी कोरोनाची संख्या चिंतेची बाब ठरली होती. मात्र बुधवारी रात्री दोनशे अहवालांमध्ये केवळ एक पॉझिटिव्ह सापडल्याने दिलासा मिळाला होता. मात्र हा दिलासा अवघ्या काही तासांचा ठरला आहे.
Previous Article‘कुंभी’ ची संपूर्ण एफआरपी रक्कम ऊस उत्पादकांच्या खात्यावर वर्ग
Next Article ‘सारथी’बाबत अजित पवार यांची महत्त्वाची घोषणा









