प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरीत सातत्याने वाढत असलेले कोरोना रुग्ण चिंतादायक ठरत असताना आता कोरोना बाधित रुग्णांची वाढती मृत्यू संख्या धोक्याची बाब बनली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात चोवीस तासात तब्बल चार कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सायंकाळी मिरकरवाडा येथील 68 वर्षीय वृद्धाचा उपचारा दरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 38 वर पोचली आहे.
गुरुवारी सकाळी तीन कोरोना बाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मृत रुग्णांमध्ये घुडेवठार, रत्नागिरी येथील 56 वर्षीय कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला.
सदर रुग्णाची बायपास सर्जरी झाली होती. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. दुसरा मृत्यू झालेला रुग्ण हा मिरजोळे, एमआयडीसी, रत्नागिरी येथून असून त्याचे वय 65 वर्षे होते. उपचार दरम्यान मृत्यू झाला. तर एक रुग्णाची माहिती अप्राप्त होती.
सायंकाळी रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा येथील कोरोना बाधित रुग्णाचा उपचारा दरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला आहे.
Previous Articleभादोलेत एक महिला पॉझिटीव्ह
Next Article कोल्हापूर : साजणी येथे एक व्यक्ती पॉझिटिव्ह








