प्रतिनिधी / रत्नागिरी
जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह तीन रुग्णांचा आज मृत्यू झाला. यामध्ये रत्नागिरीतील 2 व खेड येथून रत्नागिरीत उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाचा समावेश आहे. त्यातील एकाची किडनी खराब झाली होती. एका रुग्णाला काल रात्री अस्वस्थ झाल्यामुळे सिव्हिल मध्ये दाखल करण्यात आले होते. रत्नागिरीतील मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून एकूण मृतांचा आकडा 37 झाले आहे.









