12 नवे रूग्ण, एकही मृत्यू नाही, शुकवारी 22 जणांना डिस्जार्च
प्रतिनिधी / रत्नागिरी
जिल्ह्यात शुकवारी कोरोनाचे 12 नवे रूग्ण आढळून आले. समाधानाची बाब म्हणजे गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रूग्णांच्या वाढीचा वेग मंदावला असल्याचे दिसत आहे. बरे होण्याचे प्रमाणही वाढले असून शुकवारी 22 बरे झालेल्या रूग्णांना घरी सोडण्यात आले.
जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून शुकवारी करण्यात आलेल्या 143 नमुन्यांपैकी 12 रूग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. यामध्ये आरटीपीसीआरमध्ये 3 तर ऍन्टीजेन टेस्टमध्ये 9 कोरोना रूग्ण आढळून आले. तालुकानिहाय आकडेवारीनुसार, दापोली 1, खेड 1, गुहागर 2, चिपळूण 1, संगमेश्वर 2, रत्नागिरी 4, लांजा 1 यापमाणे रूग्ण सापडले आहेत. जिह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 8 हजार 442 इतकी झाली आहे.
जिल्ह्यात कोरोनापासून बरे होण्याचे प्रमाणही वाढताना दिसून येत आहे. शुकवारी 22 बरे झालेल्या रूग्णांना घरी सोडण्यात आले. यामुळे एकूण बरे झालेल्याची संख्या 7 हजार 839 इतकी झाली असून बरे होण्याचे पमाण 92.97 इतके झाले आह़े जिल्ह्याचा मृत्यूदर 3.74 इतका राहिला आहे.
एकूण रूग्ण-8442
नवे रूग्ण -12
नवे मृत्यू -00
एकूण मृत्यू -316









