अपघातात बळी गेल्यानंतरही ठेकेदार कंपनीला जाग नाही
संगमेश्वर / प्रतिनिधी
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर तुरळ येथे महामार्गाच्या अर्थवट कामामुळे मोठी वाहने उलटी होण्याचे प्रमाण वाढले आहे. एका बाजूला खड्डे आणि दुसऱ्या बाजूला अर्थवट कामे यामुळे वाहन चालक आणि ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. ही कामे त्वरित सुरू न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना शाखाप्रमुख अरविंद जाधव यांनी दिला आहे.
आरवली ते तुरळ दरम्याने महामार्गावर खड्डे पडले आहेत. दोन वर्षापूर्वी याच ठिकाणी अपघात झाल्याने शिंदे आंबेरी येथील शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते बने यांचा निष्पाप बळी गेला होता. आठवड्यात दोन अपघात होऊन वाहनांचे मोठे नुकसान झाले होते मात्र अजूनही कोणत्याही विभागाला जग येत नसल्याने संतप्त झालेले शिवसेना शाखाप्रमुख अरविंद जाधव यांनी रस्त्या सुरळीत न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे









