प्रतिनिधी / खेड
भरणे येथील साई रिसॉर्टमध्ये काम करणाऱ्या आचाऱ्याने रोखपालाच्या खिशातून गल्ल्याच्या चाव्या काढत ३५ हजार रूपये लांबवल्याची तक्रार येथील पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. त्यानुसार रॉबिन धोष (रा. पश्चिम बंगाल) या संशयित आचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना ११ ते १२ जुलै दरम्यान घडल्याचे साई रिसॉर्टचे सुरज शेट्टी यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. हा संशयित साई रिसॉर्टमध्ये आचारी म्हणून काम करत होता. कॅशियर सागर चव्हाण रिसॉर्टमध्येच झोपलेले असताना त्यांच्या खिशातील गल्ल्याची चावी काढून ३५ हजार रूपये लंपास केले. ही बाब त्यांच्या लक्षात आल्यानंतर याबाबत सुरज शेट्टी यांना कळवले. याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत.









