‘तरूण भारत’च्या वृत्ताने झाली कार्यवाही, नागरिकांमधून समाधान
वार्ताहर / मौजेदापोली
दापोली शहरातील फॅमिलीमाळ येथील तीन इमारतींमधील सांडपाणी रस्त्यावर येत होते. त्यामुळे या मार्गावरील नागरीकांना सांडपाण्यातून ये जा करावी लागत होती. परंतु दापोली नगरपंचायतीने तेथील संबंधीत तिनही इमारतींमधून येणाऱ्या सांडपाणी योग्यती कारवाई करून रोखले आहे. त्यामुळे नागरिकांसह येथील रस्त्याची देखील दुर्गंधीपासून सुटका झाली आहे.
या सांडपाण्याबाबत वेळोवेळी दापोली नगरपंचायतीला तेथील नागरीकांकडून कळविण्यात आले होते. परंतु योग्यरित्या कार्यवाही करण्यात आली नसल्याचे तेथील अनेक नागरीकांमधून बोलले जात होते. याबाबत ‘तरूण भारत’ने वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर तात्काळ हे सांडपाणी रोखण्यात आले. यामुळे परिसरातील नागरिकांनी समाध्यान व्यक्त केले आहे.









