प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना मृत्यूदर कमी करण्यासाठी रविवार १८ रोजी साडेबारा वाजता प्लाझ्मा थेरपी सुविधेचे ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. राज्यामध्ये जिल्हा रुग्णालयातील हे पहिले प्लाझा थेरपीचे केंद्र आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचा २८ दिवसानंतर प्लाझ्मा घेण्यात येतो. त्याचा अतिगंभीर रुग्णांसाठी वापर केला जातो. लवकरच रत्नागिरी शासकीय रुग्णालयात ऑक्सीजन प्लांट बसवण्यात येणार आहे.