प्रतिनिधी/दापोली
दापोली तालुक्यातील हर्णे येथे केवळ जेट्टी नसल्याने मोठा वारा आल्याने किनाऱ्यावर नांगरून उभी असणारी नौका आतील सामानासह समुद्रात बुडाली. यात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही.
याबाबत सविस्तर वृत्त असे की हर्णे गावातील महेश रघुवीर यांच्या मालकीची परमेश्वरी ही नौका रविवारी रात्री मासे पकडण्यासाठी समुद्रात जाणार होती या करिता लागणारे सर्व साहित्य बोटीमध्ये भरून ठेवण्यात आले होते. ही नौका समुद्र किनारी नांगरून ठेवण्यात आली होती. बोटीत 2 तांडेल व 5 खलाशी असे एकुण 7 जण होते.
मध्यरात्री वाऱ्याचा वेग वाढल्यावर तोल जाऊन ही बोट किनाऱ्यावरच एका बाजूला कलंडली. यामुळे मासेमारीसाठी बोटीत भरून ठेवलेले सर्व साहित्य समुद्रामध्ये पडले व बोट मालकाचे सुमारे चाळीस लाखाचे नुकसान झाले. यात मासे पकडण्यासाठी वापरण्यात येणारी जाळी, बर्फ, डिझेलचे कॅन यांच्यासह बोटीचे देखील नुकसान झाले आहे शिवाय समुद्राचे खारे पाणी इंजिनमध्ये गेल्यामुळे इंजिनचे देखील नुकसान झाले आहे .
सोमवारी सकाळपर्यंत ही बोट समुद्रकिनाऱ्यावर ओढून आणण्याचा प्रयत्न सुरू होते. या बोटीमध्ये असणारे सात जणांनी वेळीच पाण्यात उद्या मारून समुद्रकिनाऱ्याकडे धाव घेतली यामुळे या प्रकरणात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले आहे. हर्णे येथे जेट्टी व्हावी ही मासेमार बांधवांची जुनी मागणी आहे. जर ही जेट्टी असती तर ही दुर्घटना घडली नसती असे मासेमारी बांधवांमधून बोलले जात आहे.
Previous Articleकोल्हापूरात ४९० कोरोनाबाधित, २७ जणांचा मृत्यू
Next Article सातारा जिल्हय़ात लॉकडाऊनचा गजर ४९८ बाधित









