प्रतिनिधी/रत्नागिरी
रत्नागिरी तालुका सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत असल्याचे दिसून येत आहे. काल, शुक्रवारी प्राप्त अहवालांमध्ये रत्नागिरी तालुक्यात कोरोनाचे तब्बल 35 रुग्ण सापडले आहेत. यापैकी रत्नागिरी शहरात 10 तर कारवांचीवाडी येथे 7 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
काल, शुक्रवारी रात्री आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात नवे 85 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. यापैकी रत्नागिरी तालुक्यात 35 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. या 35 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सर्वाधिक 7 रुग्ण कारवांची वाडी येथील आहेत. याशिवाय कोकण नगर येथील कोकण नगर येथील 3, लक्ष्मी चौक गाडीतळ येथील 4 पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय पूर्णगड येथे 2 रुग्ण सापडले आहेत. तसेच शांतीनगर, कापडगाव, कुवारबाव, साखरपा भडकंबा, आंबेशेत, पोलीस स्टेशन रत्नागिरी, गोडबोले स्टॉप, थिबा पॅलेस, हर्णे, जयगड, तेली आळी, देवुड, राजापूर (ऍडमिट), भाट्ये, दापोली (ऍडमिट) आणि कासारवेली येथे नवे रुग्ण सापडले आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









