मत्स्य उद्योगाचे लाखोंचे नुकसान, प्रशासनाकडून खलाश्यांची कोविड चाचणी
प्रतिनिधी / रत्नागिरी
टाळेबंदीच्या कडक अंमलबजावणीमुळे मिरकरवाडा बंदरामधून ठराविकच नौका मासेमारीसाठी गेल्या मात्र इतर नौका बंदरातच उभ्या असल्यामुळे नेहमी गजबजलेले बंदरावर शुकशुकाट पसरलेला होता तसेच नौकावरील खलाशी वर्गाची पोलीस पशासनानकडून रॅपिड अँन्टीजन चाचणी करण्यात येत होती.
टाळेबंदीचा फटका मत्स्य व्यवसायाला देखील बसण्यात सुरुवात झाली आहे. पकडून आणलेल्या मासळीच्या खरेदीला ग्राहक नसल्यामुळे मच्छीमारांनी बंदरातच राहणे पसंत केले आहे तर किरकोळ मासेमारी नौका मासेमारीसाठी जात आहेत. ही मासळी मिळेल त्या दरामध्ये मासळी प्रक्रिया कंपन्यांना विकावी लागत आहे. त्यामुळे मच्छीमारांना चांगलाच आर्थिक भुर्दंड बसत आहे.









