प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हय़ामध्ये कोरोना डेल्टा प्लस व्हेरिएंटचे आणखी 3 रूग्ण आढळले आहेत. जिह्यातील डेल्टा प्लस रूग्णांची एकूण संख्या आता 15 झाली आह़े संगमेश्वर तालुक्यातील आंगवलीत 2 तर धामणीत 1 डेल्टाचे नवा रूग्ण आढळून आल्याची माहिती †िजल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान सोमवारी जिल्हय़ात कोरोनाचे 120 नवे रूग्ण आढळून आले आहेत. 6 जणांच्या मृत्युची नोंद झाली आह़े
जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी जिल्हय़ात एकूण 9189 कोरोना चाचण्या करण्यात आल्य़ा यामध्ये आरटीपीसीआरच्या 4633 चाचण्यांपैकी 77 तर ऍन्टीजेनच्या 4556 पैकी 43 चाचण्यांचे अहवाल कोरोनाबाधित आढळले असे कोरोनाचे 120 नवे रूग्ण आढळून आले. यामध्ये मंडणगड 8, दापोली 10, खेड 14, गुहागर 8, चिपळूण 5, संगमेश्वर 13, रत्नागिरी 52, लांजा 4 तर राजापूर 6 अशे तालुकानिहाय रूग्णसंख्या आह़े जिह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 74276 झाली आह़े आरटीपीसीआर चाचणीनुसार जिह्याचा पॉ†िझटिव्हीटी रेट 1.66 टक्के आह़े
जिह्यामध्ये सोमवारी एकूण 6 मृत्यूची नोंद करण्यात आल़ी मृतांमध्ये दापोली व राजापुरातील प्रत्येकी 1 तर चिपळूण व रत्नागिरीतील प्रत्येकी 2 अशी 6 मृत्यूंची नोंद झाली आह़े यामुळे जिह्यातील मृतांची एकूण संख्या 2 हजार 208 व मृत्यूदर 2.97 झाला आह़े बरे झालेल्या 52 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून एकूण बरे झालेल्यांची संख्या 70 हजार 202 झाली आह़े बरे होण्याचे प्रमाण 94.53 आह़े जिह्यात 1 हजार 730 रूग्ण उपचारात दाखल असून यामध्ये केवळ 337 रूग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली आहेत़









