चिपळूण/प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात जिल्यातील २६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये चिपळूण तालुक्यातील १२, राजापुरातील ४, रत्नागिरीतील ६, कळंबणीतील ३ व संगमेश्वरमधील १ असे रूग्ण आहेत. नव्याने 26 रुग्णांची भर पडल्याने आता जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २३४ वर पोहोचली आहे. चिपळूणमधील १२ पॉझिटिव्ह रुग्णांमधील अकराजण तालुक्यातील धामेली गावातील आहेत. हे सर्व मुंबईहून आलेले आहेत. चार दिवसांपूर्वी या गावात सहा रुग्ण आढळले होते. त्यामुळे या गावातील रुग्ण संख्या १७ वर पोहचली आहे. तर तालुक्यातील एकूण संख्या आता ३१ झाली आहे. तर आजच्या प्राप्त अहवालात एक पॉझिटिव्ह तालुक्यातील तिवडी गावातील आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









