प्रतिनिधी / रत्नागिरी
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत होत असलेली घट ही दिलासादायक बाब ठरत आहे. शनिवारी जिल्ह्यात कोरोनाचे एकूण 44 रूग्ण सापडले. त्यामुळे जिह्यातील कोरोना रूग्णांची एकूण संख्या 7 हजार 973 झाली आह़े खेडमधील एका 72 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल़ा शनिवारी 33 रूग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. आत्तापर्यंत 7 हजार 71 रुग्णांनी कोरानावर मात केली असून बरे होण्याचे प्रमाण 88.68 झाले आह़े.
शनिवारी आरटीपीसीआर टेस्टमध्ये 21 तर अँन्टीजन टेस्टमध्ये 23 असे 44 नवे रूग्ण आढळून आले. यामध्ये रत्नागिरी 20, देवरूख 1, गुहागर 4, लांजा 3, मंडणगड 2, कळंबणी 5, कामथे 8 व दापोली 1 अशी रूग्णांची संख्या आह़े.
मनोरुग्णालयात 10 रूग्ण,14 कर्मचाऱ्याना बाधा
रत्नागिरी जिल्हा पादेशिक रूग्णालयात आतापर्यंत 24 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात तेथील 10 रूग्णांसह 14 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शासनाकडून राज्यातील 4 मनोरूग्णालयांचा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यात आला. यात 188 रूग्ण व कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली होत़ी.
एकूण रूग्ण – 7973
नवे रूग्ण – 44
नवे मृत्यू – 01
एकूण मृत्यू – 292
Previous Articleखेड नगपरिषदेसाठी अद्ययावत कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध
Next Article चिपळुणात विवाहितेसह दोघांची आत्महत्या









