प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ११९ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण कोरोना रुग्णांची संख्या ६,५३६ वर पोहोचली आहे. आज रत्नागिरीमधील ३ तर चिपळुणातील २ अशा ५ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १९८ झाली आहे. सध्या जिल्ह्यातील कोरोना मृत्यूदर ३.०३ आहे.
आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू रत्नागिरीत झाले असून ६० जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यापाठोपाठ चिपळूण ४८, खेड २८, दापोली २४, संगमेश्वर १७ असे आहेत. आतापर्यंत ३८ हजार ११४ जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
Previous Articleटायर चोरणारी सात जणांची टोळी गजाआड
Next Article सायकल चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद









