प्रतिनिधी / रत्नागिरी
कोरोना साथ आल्यापासून जिल्हा रुग्णालयात पाय रोवून लढा देणाऱ्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांची कोरोना तपासणी पॉझिटिव्ह आली आहे. मागील सुमारे आठ महिने डॉ. फुले यांनी कोरोना विरोधातील लढाईत अग्रक्रमाने लढा दिला होता. सुरक्षेच्या कारणास्तव त्या दर पंधरा दिवसांनी आपली टेस्ट करत होत्या. अखेर आज त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना सध्या सौम्य स्वरूपाची लक्षणे दिसून येत असून यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Previous Articleभरणेनजीक अपघातात एकजण गंभीर जखमी
Next Article फेसबुककडून 22 लाख आक्षेपार्ह जाहिरातींना डच्चू









