प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये नर्स आणि ब्रदरचा समावेश आहे.
या रुग्णांच्या संपर्कात आतापर्यंत अनेकजण आले असून या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन केले जाण्याची शक्यता आहे. यामुळे आता जिल्हा रुग्णालयातील कामकाज बघायचे कोणी अशी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. तालुक्यात नव्याने पाच रुग्ण सापडले असून यापैकी तिघेजण सिविल मधील स्टाफ आहे.









