माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या प्रयत्नाने दीड कोटी निधी मंजूर, इमारतीचे काम प्रगतीपथावर, आमदार योगेश कदमांकडून कामाची पाहणी
प्रतिनिधी/खेड
तालुक्यातील जामगे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणीसाठी माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या प्रयत्नाने दीड कोटीचा निधी मंजूर झाला असून इमारतीचे बाधंकामही प्रगतीपथावर आहे. आमदार योगेश कदम यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतीची पाहणी करत अभियंत्यांसह ठेकेदाराशी चर्चा करत बाधंकाम लवकरच लवकर पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. हे प्राथमिक आरोग्य केंद्र जनतेसाठी खुले झाल्यानंतर रूग्णांची यातायात कायमचीच थांबणार आहे.
तालुक्यातील जामगे, आंबये, चिंचघर व भोस्ते या फुरुस प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रांचा समावेश करून नवीन जामगे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले आहे. सद्यस्थितीत या गावासह अन्य पंचक्रोशीतील ग्रामस्थांना २० किमी अंतरावर असलेल्या फुरुस आरोग्य केंद्रात उपचारांसाठी जावे लागत होते. यासाठी वेळ व आर्थिक भुर्दंड देखील सहन करावा लागत होता.
पंचक्रोशीतील रूग्णांना तातडीने उपचार मिळावेत याकरिता या प्राथमिक आरोग्य केंद्राला तत्कालीन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला होता. गतवर्षी या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती कामाचे भूमिपूजन झाले होते. कोरोनामुळे दोन महिने या केंद्राच्या इमारतीचे बांधकाम रखडले होते. मात्र, अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर रखडलेल्या बांधकामास पुन्हा वेग घेतला आहे.
आमदार योगेश कदम यांनी बांधकाम सुरू असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची पाहणी केली. हे प्राथमिक आरोग्य केंद्र जनतेसाठी लवकरच लवकर खुले करण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना सूचना केल्या. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य अरुण कदम, पंचायत समिती सभापती विजय कदम, उपसभापती जीवन आंब्रे, शशिकांत चव्हाण, शैलेश कदम, सचिन निकम, राजेश मोरे, तालुका आरोग्य विभागाचे डॉ. चेतन कदम, आरोग्यसेवक अजित तटकरे आदी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









