मार्गताम्हाने / वार्ताहर
चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने येथे आज, मंगळवारी, मध्यरात्री तीनच्या सुमारास झालेल्या अग्नी तांडवात दुचाकीसह चारचाकी वाहन जळून खाक झाले. येथील अजित साळवी यांची ही वाहने घराखालील पत्र्याच्या शेडमध्ये पार्कींग करुन ठेवण्यात आलेली होती. सुमारे 10 लाखांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झालेले आहे.
जवळच असलेल्या रुग्णालयाच्या कंपाऊंडरने ही आग पाहिल्याने ती लगेच आटोक्यात आणण्यात आली. अन्यथा, साळवी यांचे निवासस्थान शेडमध्ये असलेली अर्बन बँकेची इमारत, किराणा मालाचे दुकानही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले असते. मात्र यांना झळ पोहचलेली नसली या आगीत मोठे नुकसान झाले आहे. ही आग नक्की लागली कशी किंवा कुणी लावली याचा तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









