वार्ताहर / लोटे
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील एक्सेल इंडस्ट्रीज लि. कंपनीत रविवारी सकाळच्या सुमारास अचानक स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली. दुर्घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे कंपनी व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.
स्फोटानंतर अचानक आगीचा भडका उडाल्याने यंत्रणांची धावाधाव सुरू झाली. औद्योगिक वसाहतीतील अग्निशमक पथकाने आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. आगीच्या स्फोटाबाबत औद्योगिक सुरक्षा विभागाकडून चौकशी करण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते.
Previous Article‘या’ कंपन्यांना मिळणार अधिक कर्मचारी कपात करण्याची मुभा
Next Article सांगलीचा ‘हॉटस्पॉट’ होतोय डेंजर झोन!









