मुंबई \ ऑनलाईन टीम
अंमलबजावणी संचालनालयाने चार वर्ष जुन्या ड्रग्स प्रकरणामध्ये टॉलिवूड आणि बॉलिवूडमधील अनेक लोकप्रिय दिग्दर्शक तसेच कलाकारांना समन्स पाठवला आहे.यामध्ये रकुल प्रीत सिंह,राणा डग्गुबती,रवी तेजा, पुरी जगन्नाख यांचा समावेश आहे.
२ ते २२ सप्टेंबर दरम्यान हे सगळे सेलिब्रिटी ईडी समोर चौकशीसाठी हजर राहतील. हे ४ वर्ष जुनं प्रकरण आहे. त्यावेळी उत्पादन शुल्क विभागाने पुराव्यांच्या अभावामुळे कलाकारांवर कारवाई केली नाही आणि सोबतच चार्जशीट देखील दाखल केले नाही.
तेलंगणा उत्पादन शुल्क विभागाने 2017मध्ये 30 लाख रुपयांचे आंमली पदार्थ जप्त केले होते. यानंतर त्यांनी तब्बल 12गुन्हे दाखल केले होते. यापैकी 11 प्रकरणामध्ये आंमली पदार्थ तस्करांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.उत्पादन शुल्क विभागाच्या प्रकरणा अंतर्गत ईडीने गुन्हा दाखल केला होता. अभिनेता सुशांत सिंह राजपूतशी संबंधित ड्रग्स प्रकरणामध्ये देखील रकुल प्रीत सिंहचीही चौकशी करण्यात आली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









