रुद्र वेबसीरिजमधील भूमिकेवरून अभिनेत्री चर्चेत
अभिनेत्री राशी खन्ना ही योद्धा चित्रपटावरून सध्या चर्चेत आहे. अभिनेत्रीने दक्षिणेतील सुपरस्टार नागा चैतन्यसोबत मॉस्कोमध्ये थँक यू या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण केल्यावर आता योद्धा चित्रपटाच्या चित्रिकरणात भाग घेतला आहे.
चित्रपटाची टीम पूर्वीपासून लोणावळय़ात चित्रिकरण करत आहे. तसेच मुंबईतील चित्रिकरण पूर्ण झाल्यावर दिल्लीसाठी टीम रवाना होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्रीसाब्sात सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री दिशा पाटनी मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे.
योद्धा हा चित्रपट भारताकडून पाकिस्तान विरोधात करण्यात आलेल्या सर्वात महत्त्वाच्या कारवाईवर आधारित असणार आहे. अभिनेता सिद्धार्थ यात रॉ एजंटच्या स्वरुपात दिसून येऊ शकतो. धर्मा प्रॉडक्शन्सकडून निर्मित होणाऱया या चित्रपटाचे दिग्दर्शन सागर आम्बे आणि पुष्कर ओझा करत आहेत. हा चित्रपट 11 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.









