बेंगळूर/प्रतिनिधी
केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या (सीबीआय) चौकशीअंतर्गत योगेश गौडा हत्याकांड प्रकरणी कर्नाटक हायकोर्टाच्या धारवाड खंडपीठाने गुरुवारी कॉंग्रेसचे माजी मंत्री विनय कुलकर्णी यांचा जामीन अर्ज फेटाळला.
न्यायमूर्ती के. एन. नटराज यांच्या अध्यक्षतेखालील एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाने बुधवारी दोन्ही बाजूंकडील युक्तिवादांची सुनावणी केली त्यानंतर गुरुवारी हे आदेश देण्यात आले.
१५ जून, २०१६ रोजी धारवाड येथील जिमच्या बाहेर दुचाकीवर आलेल्या अज्ञात व्यक्तींनी योगेश गौडा या भाजप जिल्हा पंचायत सदस्याला ठार मारले. राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर गेल्या वर्षी हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले होते.