प्रतिनिधी/ रत्नागिरी
देशात राजकीय, सामाजिक अशा सर्वच क्षेत्रात आतंकवाद तयार होत आहे. या सर्व प्रकारच्या आतंकवादाला राष्ट्रभक्ती व अध्यात्मशक्ती वादच टाळणार आहेत. सर्वजण रोगमुक्त…नशामुक्त…तंटामुक्त कसे होतील, याकडे पाहिले जात आहे. त्यावर उपाय म्हणून योग आधारावर पुढे जात असल्याचे प्रख्यात योगगुरू रामदेव बाबा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. गेल्या 9 वर्षांपासून आपण कोणत्याही राजकीय पक्ष-विपक्षात न राहता राष्ट्रनिर्माण कार्यात गुंतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहात योगगुरू रामदेव बाबा यांची पत्रकार परिषद पार पडली. आज बुधवार 9 मार्च रोजी आयोजित केलेल्या योगशिबिरासाठी रामदेव बाबा 11 वर्षांनंतर पुन्हा एकदा रत्नागिरीत आले आहेत. कोरोना काळातील 2 वर्षानंतर पंतजली योग समितीतर्फे योग शिबीर घेण्याचा पहिलाच कार्यक्रम रत्नागिरीत होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या प्रखर राष्ट्रनिष्ठेचे व त्यांच्याप्रती सुरू असलेल्या कार्याचे भरभरून कौतुक केले. रत्नागिरीतील कमी प्रदुषणाच्या वातावरणाबाबत रामदेव बाबा यांनी आवर्जून उल्लेख करताना आकाशातून किंवा जमिनीवरून कुठेही पाहिले तरी रत्नागिरी स्वर्गासारखी दिसते. त्यामुळे योग्य आचरण ठेवले तर येथील लोक कधीही व्यधीग्रस्त होणार नाहीत. येथील लोकांमध्ये संतूष्ट स्वभाव व सात्विकता असल्याचे सांगितले.
गेल्या 45 वर्षांपासून आपण योगसाधना करत आहे. त्या आधारावर जगातील 200 देशातील 200 करोड लोक आज योगसाधनेला महत्व देत असल्याचे रामदेव बाबा यांनी सांगितले. भारत हे परमाणू राष्ट्र आहे. त्यामुळे युक्रेनसारखे या देशावर कुणीही आक्रमण करू शकणार नाही, बेचिराख करणार नाही. कारण भारताची शैक्षणिक, आथिंक शक्ती मजबूत आहे. देशाला सैन्यशक्तीपेक्षा अधिक शक्तीशाली करायचे आहे. त्यामुळे गलत लोकांच्या हातात सत्ता आणि संपत्ती देता कामा नये. येणाऱया 2045 सालापर्यंत जगातील सर्वात महाशक्ती बनवण्याची ‘आधारशिला’ करत आहे. त्याद्वारे आथिंक, राजनितीक, सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक अशा सर्व बाजूनी जगात भारत महाशक्तीशाली बनण्यास मदत होणार असल्याचे योगगुरू रामदेव बाबा यांनी सांगितले.
पाच राज्यांच्या निवडणूक निकालात आत्मचिंतन करण्याचा मिळेल धडा
देशातील पाच राज्यात नुकत्याच निवडणुकीचे मतदान प्रक्रिया पार पडली आहे. मतदानाचे तऱहेतऱहेने अंदाज वर्तवले जात आहेत. अनेकजण भाजपा रसातळाला जाईल, अशा भाबडय़ा विचारात आहेत. पण तसं होणार नाही. केजरीवालांचे पण चांगले कार्य चालले ओह. काँग्रेसदेखील नव्याने मार्गक्रमण करत आहे. एकंदरीत साऱयांनाच या निवडणुकींच्या निकालाने आत्मचिंतन करण्याची वेळ मिळणार असल्याचे योगगुरू रामदेव बाबा यांनी सांगितले.
कोरोनातील 90 टक्के लोक योग आधावरच बरे झालेः रामदेव बाबा
कोरोना काळात पतंजलीच्या आयुर्वेद संशोधन कार्यावरून वाद निर्माण झाला होता. पण त्या वादाच्या आगीत आपण जास्त वाद न घालता ‘घी डालना कम किया’ असे योगगुरू रामदेव बाबा यांनी स्पष्ट केले. त्यामुळे वादाची उडालेली ठिणगी आपोआप विझली. काहीजण सर्वशक्तीमान म्हणत होते. त्यामुळे थोडी आग लागलेली होती. पण कोरोना काळात 90 टक्के लोक हे योग आधारावरच पूर्ण बरे झाल्याचे सांगितले.
स्वातंत्र्यवीर सावरकर ‘भारतरत्न’चे हक्कदार
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कार्य भारताच्या अखंडतेसाठी, स्वातंत्र्यतेसाठी, राष्ट्रभक्तीसाठी अलौकीक असे आहे. त्यामुळे सावरकर हे भारतरत्न आहेत. आणि ते हक्कदार देखील आहेत. त्या बाबत शासकीय स्तरावर घोषणा झाली आहे.









