ऑनलाईन टीम/ नवी दिल्ली
योगगुरु बाबा रामदेव यांचा कोरोनावरील उपचारासंदर्भात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये, एलोपॅथी उपचारपद्धतीबद्दल त्यांनी अविश्वासर्हता दर्शवली आहे. कोरोनावरील उपचार पद्धतीत फॅबीफ्लू आणि स्टेरॉईडसह अन्य अँटीबॉयोटीक्सही फेल ठरल्याचं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू हे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे न होता, एलोपॅथिक औषधांमुळेच झाल्याचा दावाही त्यांनी केलाय.
इंडियन मेडिकल असोसिएशनने बाबा रामदेव यांनी केलेल्या या दाव्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच, त्यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करा, अशी मागणीही संघटनेच्यावतीने केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. इंडियन मेडीकल असोसिएशनने याबाबत एक परिपत्रक जारी करुन ही मागणी केली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









