येळळूर / प्रतिनिधी
येळळूर गावाबद्दल काही जण वेगवेगळे अंदाज व्यक्त करतात. याठिकाणी निवडणूकीदरम्यान वादावादीचे प्रकार घडतात. असे सांगण्यात येत होते. मात्र प्रत्यक्षात अंत्यत शांत गाव असून निवडणूक प्रक्रिया ही अंत्यत शांततेने पार पडली. सर्वांनी आम्हाला सहकार्य केले असे गावा मी आतापर्यंत पाहिलेच नाही, अशा शब्दात येळळूर ग्राम पंचायतीचे पीडीओ अरूण नायक यांनी येळळूर गावाबद्दल आपला विश्वास केला.
नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्यांना प्रमाणपत्राचे वाटप करताना त्यांनी वरील उद्गार काढले आहेत. शनिवारी येळळूर ग्राम पंचायतीमध्ये बोलावून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. त्यावेळी विविध मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले आहे. नुतन सदस्यांचे स्वागत यावेळी करण्यात आले. सर्वांनी एकजुटीने राहून गावचा विकास करण्याबाबत प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले.
यावेळी अनुसया परीट, राकेश परीट, सोनाली येळळूरकर, दयानंद उगाडे, जोतिबा चौगुले, महेश कानशिडे, प्रमोद पाटील, विलास बेडरे, सतिश पाटील, विजेता मासेकर, पार्वती रजपूत, वनिता परीट, मनिषा घाडी, परशराम परीट, शालन पाटील, रूपा पुण्याण्ण्णावर, सुवर्णा बिजगकर, अरविंद पाटील, शशीकांत धुळजी, लक्ष्मी कणबरकर, राजू डोण्यान्नावर, शांता काकतकर, सुनिल अरळीकट्टी, रेणुका मेलगे, शांता मासेकर, प्रदीप सुतार, कल्लाप्पा मेलगे या सदस्यांना प्रमाणपत्र वाटप करून गौरव करण्यात आला.
या सत्काराप्रसंगी तलाठी मयुर मासेकर, सचिव सदाशिव मराठे, उदय हुंदरे, कलमेश कोकणे, महादेव मुरकुटे, पुंडलिक तळवार, निर्मला भारसकळे, सुशिला मेलगे, शिवाजी हुवाण्णावर, संतोष हुवाण्णावर आदी उपस्थित होते.









