येमेनच्या वाळवंटात एक अशी विहिर आहे, जिने वैज्ञानिकांसमोर दीर्घकाळापासून रहस्य निर्माण केले होते. येमेनच्या बरहून येथील या विहिरीला ‘नर्काचा मार्ग’ म्हटले जात होते. पण या विहिरीत आता ओमानमधील 8 लोकांचे पथक उतरले आहे. या खड्डय़ात सैतानांना कैद केले जात होते अशी वदंता आहे. स्थानिक लोक याच्या जवळ जाणे तर दूरच राहिले याबद्दल बोलणे देखील टाळतात.
ओमाननजीक मिळालेला हा खड्डा 30 मीटर रुंद आणि 100-250 मीटर खोल आहे. ओमान केव एक्सप्लोरेशन टीम (ओसीईटी) या खड्डय़ात उतरल्यावर तिला तेथे मोठय़ा संख्येत साप आढळून आले. याचबरोबर मृत प्राण्यांचे अवशेष आणि मोती देखील आढळले आहेत.
येथील गुहेच्या भिंतींची रचना अत्यंत वेगळी आहे. तर तथे करडय़ा तसच हिरव्या रंगाचे मोती मिळाले आहेत, जे वाहत्या पाण्यामुळे निर्माण झाले आहेत. हा खड्डा अत्यंत खोल असल्याने याच्या तळाला अत्यंत कमी ऑक्सिजन आणि व्हेंटिलेशन आहे. या खड्डय़ानजीक असलेल्या वस्तू आतमध्ये खेचल्या जातात असे परिसरात राहणाऱया लोकांचे म्हणणे आहे. हा खड्डा लाखो वर्षे जुना असल्याने याचे अधिक अध्ययन, संशोधन करण्याची गरज असल्याचे संबंधित तज्ञाने म्हटले आहे









