बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात नेतृत्व बदलांच्या चर्चा सुरु आहेत. दरम्यान भाजप नेत्यांनी या अफवा असल्याचे म्हंटले आहे. तसेच भाजपचे राष्ट्रीय प्रभारी अरुण सिंग यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांची जागा घेण्यास नकार दिला आणि बी. एस. येडियुरप्पा हेच मुख्यमंत्री पदावर कायम राहतील, असे प्रतिपादन केले.
अरुण सिंग म्हणाले, “येडियुरप्पा मुख्यमंत्री आहेत. ते एक चांगले काम करत आहेत आणि मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील. कोविड परिस्थितीत त्यांनी चांगले काम केले आहे, सर्व मंत्री आणि पक्ष- प्रत्येकाने चांगले काम केले आहे,” असे ते दिल्ली येथे बोलताना म्हणाले.
“मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा मागण्याबाबत उच्च कमांड स्तरावर कोणतीही चर्चा झालेली नाही. मुख्यमंत्री येडियुरप्पा हे मुख्यमंत्री म्हणून एक चांगले काम करीत आहेत. मंत्री आणि आमदार यांच्यासमवेत ते परिश्रम घेत आहेत, संघटनाही चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे. येडियुरप्पा मुख्यमंत्रिपदी कायम राहतील, असेही ते म्हणाले. सत्ताधारी भाजपच्या एका गटाने येडियुरप्पा यांना न जुमानता दबाव आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा गेल्या काही काळापासून सुरू आहे.