तरुण भारत संवाद प्रतिनिधी/पंढरपूर
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा निकाल आज, जाहीर झाला. यामध्ये पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील राहुल चव्हाण आणि कासेगाव येथील अभयसिंह देशमुख यांनी यश संपादन केले आहे.
तालुक्यातील खर्डी येथील राहुल चव्हाण यांना यूपीएससी परीक्षेत 109 वा रँक मिळाला आहे. तर कासेगावच्या अभयसिंह देशमुख यांना 151 वा रॅंक मिळाला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही युवकांचे शालेय आणि उच्च माध्यमिक शिक्षण हे पंढरपुरातच झाले.
यामध्ये खर्डीचे चव्हाण हे तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. तर देशमुख यांचा हा यूपीएससी परीक्षेचा तिसरा प्रयत्न होता. विशेष म्हणजे देशमुख तीनही वेळा लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये आता देशमुख यांना आयपीएस आणि चव्हाण यांना आयएएस केडर मिळेल.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









