मुंबई / ऑनलाईन टीम
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ‘यूपीए’च्या अध्यक्षपदासाठी शरद पवार यांचे नाव सुचवले होते. यावर काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त करत टीका केली होती. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीचे अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याकडेच राहील तसेच यूपीएचा अध्यक्ष बदलावा अशी परिस्थिती सध्या नाही असे ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.
यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले, संजय राऊत हे मोठे नेते आहेत. ते संपादकही आहेत. महाविकासआघाडीचं सरकार स्थापन करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. मात्र, तरीही संयुक्त पुरोगामी आघाडीचे अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याकडेच राहील. यूपीएचा अध्यक्ष बदलावा अशी परिस्थिती सध्या नाही.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि भाजप नेते अमित शहा यांच्यात अहमदाबाद येथे झालेल्या कथित भेटीसंदर्भातही बाळासाहेब थोरात यांनी भाष्य केले. जी भेट झालीच नाही त्यावरुन वाद निर्माण केला जात आहे. अशाप्रकारचा संभ्रम निर्माण करुन उपयोग नाही. भाजपने काहीतरी अफवा पसरवू नयेत. तसेच आपण शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम पडावा, अशी प्रार्थना करत असल्याचेही देखील बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सांगितले.
काँग्रेस नेते नाना पटोले तसेच हुसेन दलवाई यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत टीका केली होती.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








