ऑनलाईन टीम / अलिगड :
उत्तर प्रदेशातील अलिगड जिल्ह्यात पुन्हा एकदा विषारी दारू पिऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लोधा जिल्ह्यातील करसुआ गावातील 9 जणांचा शुक्रवारी विषारी दारू पिऊन मृत्यू झाला आहे. दोन जणांची प्रकृती गंभीर झाल्याने दोघांनाही मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची महिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी गावातील दोन देशी दारूची दुकाने सील केली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत एकूण 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2 जणांची प्रकृती गंभीर आहे. तर प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, यातील 6 जणांचा मृत्यू दारू पिऊन झाला आहे. तर अन्य तिघांचे पोस्टमार्टम रिपोर्ट येणे बाकी आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची माहिती घेऊन दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
एसडीएम रणजित सिंग यांनी याबाबत माहिती सांगितले की, या घटनेची माहिती मिळताच आम्ही दोन्ही दारूची दुकाने सील केली आहेत. तर दारूचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून अधिक तपास करीत आहोत.









