दुबई
संयुक्त अरब अमीरात म्हणजेच यूएई कोरोना काळात नुकसानीत राहिलेल्या आपल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी गुंतवणूकदारांसह अन्य विशेष प्रतिमा असणाऱया विदेशी नागरिकांना आपल्या देशाचे नागरिकत्व देण्याची योजना आखणार असल्याचे सांगण्यात येते. याबाबतची माहिती काही न्यूज एजन्सीमधून देण्यात आली आहे. कोरोना काळातील संकटातून सावरण्यासाठी अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी हा मार्ग स्विकारण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. या अगोदर यूएई यांनी फिलिस्तीनियांना आणि अन्य नागरिकांना नागरिकत्व बहाल केले आहे. ज्यांनी वर्ष 1971 मध्ये संघटनेच्या मदतीने देशात सरकार बनविण्यास योगदान दिले होते. दुबईचे प्रशासक असणारे शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी शनिवारी या मोठय़ा निर्णयाची घोषणा केली आहे. यामध्ये कलाकार, लेखक, डॉक्टर्स, इंजिनिअर्स आणि संशोधकांसह अन्य परिवारातील लोकांना नागरिकत्व दिले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. नागरिकता प्राप्त झाल्यानंतर यूएई क्रॅडल-टू-गेव चाही अधिकार प्रदान करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.









