पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रारंभ
कोल्हापूर प्रतिनिधी
नैसर्गिक रंगाचा आग्रह धरत पर्यावरणपूरक रंगपंचमीला प्रोत्साहन, बळ देण्यासाठी युवासेनेने मोहीम सुरू केली आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत नैसर्गिक रंग देणाऱ्या झाडाच्या लागवडीची सुरूवात करण्यात आली. कोल्हापूर युवासेनेने एकहजारहून अधिक रंग देणाऱया वृक्षाची लागवड, जतन, संवर्धन करण्याचा निर्धार केला असून ठाकरे यांच्या कोल्हापूर दौऱ्यात प्रत्यक्षात या मोहिमेस प्रारंभ झाला.
या संदर्भात माहिती देताना युवासेना जिल्हा प्रमुख मंजीत माने यांनी सांगितले, रंगपंचमी जवळ आली आहे. पण शरीराला अपायकारक, प्रदूषण निर्माण करणारे केमिकलयुक्त रंग अजूनही बंद झालेले नाहीत. या रंगांना पर्याय देण्यासाठी नैसर्गिक रंगांचा आग्रह धरत कोल्हापूर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हय़ात 1000 नैसर्गिक, रंग निर्माण होणाऱ्या रोपांची लागवड सुरू केली आहे. युवासेनेचा प्रत्येक पदाधिकारी 100-100 झाडे घेऊन शेतामध्ये लावणार असून त्या झाडांपासून तयार होणारा रंग वापरण्याचा संदेश देणार आहेत.
या उपक्रमाची सुरूवात पर्यावरणमंत्री ठाकरे यांच्या उपस्थितीत झाली. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख अरुणभाई दूधवडकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, ,जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, युवासेनेचे कुणाल शिंदे, वैभव जाधव, अवदेश करंबे, सनराज शिंदे, शुभम अरंडेआदी