प्रतिनिधी /बेळगाव
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने खासदार संभाजी राजे छत्रपती यांना रविवारी निवेदन देऊन राज्य सभेत सीमाप्रश्नी आवाज उठविण्याची मागणी करण्यात आली. सीमाभागातील मराठा समाजाचे आणि मराठी भाषिकांचे नेतृत्व करावे अशी मागणी निवेदनाद्वारे त्यांच्याकडे करण्यात आली.
एका खासगी कार्यक्रमासाठी खासदार संभाजी राजे भिवशी ता. निपाणी येथे आले होते. त्यावेळी युवा समितीच्या पदाधिकाऱयांनी त्यांची भेट घेऊन सीमाप्रश्नासाठी आवाज उठविण्याची मागणी केली. यावेळी अध्यक्ष शुभम शेळके, सरचिटणीस श्रीकांत कदम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.









