कराड / प्रतिनिधी
दैनिक तरुण भारतचे पत्रकार काले गावाचे सुपुत्र व होतकरू सामाजिक कार्यकर्ते संतोष गुरव यांचे आकस्मित निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, लहान मुलगी, आई, वडील असा परिवार आहे. गुरव कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने युवा कराडकर या कराडमध्ये नव्याने स्थापन झालेल्या सोशल मिडिया ग्रुपच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांना सामाजिक बांधिलकीच्या नात्याने पंधरा हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. येथून पुढेसुद्धा गुरव कुटुंबियांच्या सुखदु:खात युवा कराडकर ग्रुप सदैव सोबत असेल, अशी ग्वाही या ग्रुपच्या सदस्यांनी दिली.
कोरोनाच्या संकट काळात माणुसकी जपण्यासाठी कराड शहरातील असंख्य युवकांनी एकत्र येवून युवा कराडकर ग्रुपची स्थापना केली आहे. कोरोना रुग्णांना रात्री अपरात्री कुठेही गरजेनुसार पोर्टेबल अक्सिजन मशीन पुरवणे, रेडमीसीवर इंजेक्शन उपलब्ध करुन देणे,गरीब व गरजू लोकांना आवश्यकतेनुसार बेड उपलब्ध करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणे, रुग्ण वाहिकेची व्यवस्था करणे यासाठी ग्रुपच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. सध्या कराड व परिसरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची माहिती काढून त्यांना प्लाझ्मा दान करण्याविषयी जागरूकता करण्याचे काम या ग्रुपने हाती घेतले आहे.
याबाबत बोलताना उमेश शिंदे म्हणाले की, कोविड १९ या विषाणूंचा प्रादुर्भाव नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्यासह आमच्या सर्व कुटुंबियांना झाला. या संकटात होणारा त्रास वेदना आम्ही अनुभवल्या असून समाजातील बाकी लोकांना याचा त्रास होऊच नये किंवा होणारा त्रास कमी प्रमाणात व्हावा, यासाठी आम्ही मित्रांनी सामाजिक जाणीवेतून एकत्र येण्याचा निर्णय घेतला व या ग्रुपची स्थापना केली आहे. या पुढील काळात कोरोना बाधित रुग्णांना सेवा देण्यासाठी आम्ही सदैव कार्यरत राहणार आहोत. 100 टक्के सामाजिक कार्य हा ग्रुपचा उद्देश आहे. कोरोना महामारीसह शहरात येणाऱ्या कोणत्याही आपत्तीच्या काळात ग्रुप सदैव तत्पर राहणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









