बनावट कागदपत्रांनी 5 कोटींचा गंडा, बँक मॅनेजरसह 23 जणांविरूद्ध गुन्हा
प्रतिनिधी/ रत्नागिरी
पीक पाणी कर्जाच्या बहाण्याने शहरातील युनियन बँकेला घालण्यात आलेल्या 5 कोटींच्या गंडा प्रकरणचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग होण्याची शक्यता आह़े एकूण बँक मॅनेजरसह 23 जणांविरूद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आह़े हा गुन्हा आर्थिक शाखेकडे वर्ग करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याची माहिती पोलिसांतील सुत्रांकडून मिळाली आह़े
दरम्यान कर्जाच्या रकमेबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत़ 5 कोटी रूपयांहून अधिक फसवणुकीसाठी केवळ 20 शेतकऱयांचा सातबारा जोडण्यात आल़ा त्यामुळे आंबा पीकासाठी 25 लाख रूपयांहून अधिकचे कर्ज कशाप्रकारे वाटण्यात आल़े हे कर्ज कुणाच्या नावावर जमा झाले तसेच कोणी हे खात्यामधून पैसे काढले याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत़ दरम्यान पोलिसांच्या तपासामध्ये या सर्व बाबी उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सन 2015-16 मध्ये रत्नागिरीमधील 20 जणांनी जयस्तंभ येथील युनियन बँकच्या शाखेत शेती पीकपाणी कर्जासाठी अर्ज केला होत़ा हे कर्ज मिळवण्यासाठी संबंधितांनी सातबारा उतारा, भाडे करारपत्र, मुखत्यारपत्र आदी बनावट कागदपत्रे बँकेला सादर केल़ी दरम्यान बँकेने या कागदपत्रांची शहानिशा न करताच 5 कोटी 12 लाख 98 हजार रूपयांच्या कर्जाचे वाटप करण्यात आल़े
दरम्यान अनेक वर्ष उलटूनही या कर्जाची परतफेड कर्जवाटप करण्यात आलेल्या संशयितांकडून करण्यात आलेली नाह़ी यासंबंधी बँकेकडून करण्यात आलेल्या ऑडीटमध्ये कर्ज घेण्यास पात्र नसताना देखील संशयितांनी खोटी कागदपत्रे सादर केल्याचे समोर आल़े तसेच या कागदपत्रांची बँकेच्या व्यवस्थापकाने कोणतीही शहानिशा केली नसल्याचे नमुद करण्यात आल़े यासंबंधी शहर पोलिसांत बँक मॅनेजरसह 23 जणांविरूद्ध तक्रार दाखल करण्यात आल़ी विरेश चंद्रशेखर (36, ऱा जोशी पाळंद रत्नागिरी) यांनी याप्रकरणी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली होत़ी









