ऑनलाईन टीम / बीजिंग :
चिनी सैन्याने मृत्यूला घाबरू नये, त्यांनी युद्धासाठी सज्ज रहावे, असे आवाहन चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी केले आहे.
मिलिट्री कमांडर्सना मार्गदर्शन करताना एका कार्यक्रमात ते बोलत होते. जिनपिंग म्हणाले, चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीला जगातील सामर्थ्यवान लढाऊ सैन्य बनायचे आहे. त्यामुळे त्यांनी मृत्यूला घाबरू नये. युद्धासाठी आवश्यक असलेल्या तयारीला गती द्या, साधनसामग्री आणि शस्त्रास्त्रांची सज्जता ठेवा, असे त्यांनी आदेश दिले आहेत.
तसेच युद्ध जिंकण्यासाठी प्रशिक्षण आणि युद्धसराव यावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. जिनपिंग यांच्या बोलण्यातून युद्धाचे संकेत मिळत आहेत. यापूर्वीही त्यांनी नौदलाला सर्व सामर्थ्यानिशी युद्धाची तयारी करून प्रत्येक आघाडीवर सतर्क राहण्यास सांगितले होते.









