क्रीडा प्रतिनिधी /फोंडा
मडकई युवक संघाने आयोजित केलेल्या एमवायएस टी-20 क्रिकेट स्पर्धेत युथ ऑफ खांडोळा संघाने सुकूर युनायटेड संघावर 41 धावांनी विजय नोंदवून पुढील फेरीत प्रवेश केला. सामनावीर ठरलेल्या अझान थोटाने या सामन्यात तडाखेबाज 93 धावा फटकावल्या.
प्रथम खेळताना युथ ऑफ खांडोळा संघाने 5 बाद 189 धावा केल्या. अझान थोटा 93, संकेत ज्योतकर 55 तर अवनीश गावकरने 17 धावांचे योगदान दिले. रविराजने 3 व गौरेशने 2 गडी बाद केले. प्रत्यूत्तरात सुकूर युनायटेडने 5 बाद 148 धावा केल्या. महेश घाडीने 45, संदिप 28, गौरेश नाईक 30 व राजदीप पाटीलने 20 धावा केल्या. सत्येंद्रने 4 व अझीमने 1 गडी बाद केला.









