वृत्तसंस्था / स्ट्रासबर्ग
डब्ल्यूटीए टूरवरील येथे शनिवारी झालेल्या स्ट्रासबर्ग महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत युक्रेनची महिला टेनिसपटू पाचवी मानांकित इलिना स्विटोलिनाने एकेरीचे जेतेपद पटकाविले.
या स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात स्विटोलिनाने रिबेकिनाचा 6-4,1-6, 6-2 अशा सेटस्मध्ये पराभव केला. या स्पर्धेत मानांकनात दुसऱया स्थानावर असलेल्या स्विटोलिनाने 2010 साली पेंच ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत मुलींच्या कनिष्ट गटातील एकेरीचे जेतेपद मिळविले होते. रविवारपासून सुरू झालेल्या फ्रेंच ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत स्विटोलिनाचा पहिल्या फेरीतील सामना रशियाच्या ग्रेश्चेव्हा बरोबर होणार आहे.









