सांबरा विमानतळावर प्रशासनाकडून स्वागत
प्रतिनिधी /बेळगाव
युक्रेनच्या खारकीक्ह येथे अकडलेले बेळगाव व बागलकोट जिल्हय़ातील 9 विद्यार्थी सुखरूप बेळगावला परतले. जिल्हा प्रशासन व त्यांच्या पालकांनी बेळगाव विमानतळावर त्यांचे स्वागत केले. 7 विद्यार्थी सांबरा तर 2 विद्यार्थी हुबळी विमानतळावर उतरले.
मुडलगी येथे जुळय़ा बहिणी प्रिया व प्रीती छब्बी, गोकाक येथील अमोघ चौगुले, रायबाग येथील प्रिया निडगुंदी यासह बागलकोट येथील दोन विद्यार्थी बेळगावमध्ये दाखल झाले. आपल्या मुलांना पाहून पालकही गहिवरले.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, आमदार अनिल बेनके, विधान परिषद सदस्य लखन जारकीहोळी, सांबरा विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.









